
How to Check CIBIL Score: आजच्या युगात प्रत्येक माणसाची स्वप्नं मोठी आहेत. पण जीवनातल्या वाढत्या गरजा आणि महागाई यामुळे त्या स्वप्नांपर्यंत पोहोचताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी कर्जाचा पर्याय चांगला ठरतो. मात्र, कर्ज सहज मिळवायचं असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर.
CIBIL स्कोअर म्हणजे काय, तो का आवश्यक आहे आणि तो कसा तपासायचा याची माहिती आपण आजच्या आमच्या या लेखात समजून घेणार आहोत.
CIBIL स्कोअर म्हणजे काय?
सिबिल स्कोअर म्हणजे तुमच्या आर्थिक शिस्तीचं प्रतिबिंब. तो 300 ते 900 या दरम्यान असतो. जर हा स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल, तर तो चांगला मानला जातो. बँकांना आणि वित्तीय संस्थांना असा स्कोअर असलेली व्यक्ती विश्वासार्ह वाटते आणि ती सहज कर्जासाठी पात्र ठरते.
जर तुमचा स्कोअर 750 पेक्षा कमी असेल, तर बँक तुमचं कर्ज मंजूर करायला किंवा कमी व्याजदरात कर्ज देण्यास टाळाटाळ करू शकते. कधी कधी कर्ज मिळालं तरी त्यावर नको तितके व्याजदर लावले जातात.
सिबिल स्कोअर कसा ठरतो?
- CIBIL स्कोअर तयार होतो तुमच्या गेल्या 24 महिन्यांच्या क्रेडिट इतिहासावर. यामध्ये खालील गोष्टींचा विचार होतो, जसं की,
- तुम्ही घेतलेल्या कर्जांचे वेळेवर हप्ते भरणे (25%)
- तुमचं क्रेडिट एक्सपोजर, म्हणजेच एकूण किती कर्ज घेतलं आहे त्याबद्दल माहिती (25%).
- क्रेडिटचा वापर कसा केला आहे (20%).
- नवीन कर्ज किंवा कार्डसाठी अर्ज (10%).
- इतर आर्थिक सवयी आणि पेमेंट पद्धती (20%).
जर तुम्ही वेळेवर कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डचं बिल भरलं नसेल, तर तुमचा स्कोअर हळूहळू खाली येतो.
CIBIL स्कोअर चांगला ठेवण्याचे फायदे
- कर्ज त्वरित मंजूर होतं
- कमी व्याजदरात कर्ज मिळतं
- क्रेडिट कार्ड्ससाठी सहज पात्रता उपलब्ध होते.
- आर्थिक विश्वासार्हतेत वाढ होते, आणि भविष्यात घर, गाडी किंवा बिझनेस लोन मिळण्यात अडथळा येत नाही.
मोफत सिबिल स्कोअर कसा तपासायचा? (How to Check CIBIL Score in Mobile)
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून CIBIL स्कोअर तपासू शकता आणि तेही पूर्णपणे मोफत.
- त्यासाठी आधी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर https://www.cibil.com/freecibilscore ही वेबसाईट उघडा.
- त्यानंतर तिथे “Get Your Free CIBIL Score” हा ऑप्शन निवडा.
- आता इथे एक फॉर्म ओपन होईल. त्यात तुमचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी आणि पासवर्ड भरा.
- ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एखादा आयडी निवडा आणि त्याची माहिती भरा.
- पुढे तुम्हाला तुमचा पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर भरावा लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर “Accept and Continue” वर क्लिक करा.
- आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP एंटर करून “Proceed” किंवा “Continue” वर क्लिक करा.
- यानंतर एक मॅसेज येईल की “तुमची नोंदणी यशस्वी झाली”.
- त्या नंतर वेबसाईटच्या डॅशबोर्डवर जाऊन तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर स्पष्टपणे दिसून येईल.
- ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असून, काही मिनिटांतच तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सहज पाहू शकता.
सिबिल स्कोअर सुधारायचा असेल तर काय करावे?
- सर्व कर्ज आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा,
- जास्त कर्ज घेण्यापासून सावध रहा,
- अनावश्यक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे टाळा,
- जुनं क्रेडिट कार्ड बंद करू नका, ते तुमच्या क्रेडिट इतिहासाच्या माहितीचा एक भाग असते.
- तुमच्या आर्थिक सवयी सुधारण्यावर भर द्या.