
Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025: कधीकाळी आपल्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणाऱ्या स्त्रिया आज स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. परिस्थिती अजूनही सगळीकडे सारखी नाही, पण महिलांमध्ये बदल घडतोय आणि या बदलाला बळ देण्याचं काम सरकार करतंय. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’तून महिलांना जे आर्थिक बळ मिळालं, त्यातूनच आता उभं राहणारं पुढचं पाऊल म्हणजे ‘पिंक ई-रिक्षा योजना’.
ही योजना म्हणजे फक्त एका वाहनाचं वाटप नाही, तर प्रत्येक स्त्रीला आपली ओळख मिळवून देण्यासाठीचा एक भक्कम आधार ठरणार आहे. राज्यातील १० हजार महिलांना शासनानं स्वतःची ई-रिक्षा देण्याचा संकल्प केलेला असून, महिला चालकांसाठी या रिक्षा ‘पिंक’ रंगात असल्याने त्या विशेष ओळख निर्माण करून देणाऱ्या ठरणार आहेत आणि सोबतच अनेक प्रवाशांना सुरक्षिततेचा अनुभव सुद्धा देणार आहेत.
योजना कुठे सुरू आहे?
याची सुरुवात नागपूर शहरातून झाली असून, तिथेच पहिल्या टप्प्यात ११ हजार अर्ज आले आणि त्यापैकी २ हजार महिलांना त्यांच्या स्वतःच्या पिंक ई-रिक्षा मिळाल्या सुद्धा. आता हाच अनुभव आता इतरही जिल्ह्यांत पोहोचवण्यात येणार असून, लवकरच पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर येथेही या योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत कशी मिळेल?
या योजनेची रचना इतकी सोपी आणि सरळ आहे की कुठल्याही घरातली महिला कोणत्याही अडचणीशिवाय यामधे सहभागी होऊ शकते.
- रिक्षाच्या एकूण किंमतीपैकी २० टक्के अनुदान हे सरकार देणार आहे.
- लाभार्थी महिलेला केवळ १० टक्के रक्कम भरावी लागेल.
- उरलेली ७० टक्के रक्कम ही अत्यल्प व्याजदरात कर्ज रूपात देण्यात येणार आहे.
म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महिलांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. घर चालवत, मुलांचं पालनपोषण करतच महिलांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी सुद्धा यामुळे मिळणार आहे.
या योजनेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे हा महिलांच्या सुरक्षिततेसाठीचा एक उत्तम पर्याय आहे. महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या पिंक ई-रिक्षा या महिलांना रात्री किंवा एकट्या प्रवासाच्या वेळी एक सुरक्षित, आणि विश्वासार्ह सेवा मिळवून देतील. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक स्वावलंबनापुरती मर्यादित राहत नाही, तर ती सामाजिक सुरक्षेचं बळ ही देते.
अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून अर्ज दाखल करताना महिलांना खालील कागदपत्रांची गरज असणार आहे,
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा संबंधित जिल्हा प्रशासनाच्या पोर्टलवर करता येईल.